S M L

परभणीत हुंड्यासाठी नवविवाहितेला पेटवलं

Samruddha Bhambure | Updated On: Jan 27, 2016 03:52 PM IST

परभणीत हुंड्यासाठी नवविवाहितेला पेटवलं

मुंबई – 27 जानेवारी : हुंड्यासाठी रॉकेल ओतून पेटवून दिलेल्या नवविवाहितेचा उपचारदरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. या प्रकरणी तिच्या पती, सासू-सासर्‍यासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथरी तालुक्यातील हदगाव नखाते गावात ही घटना घडली.

मालंदी शेख मुनव्वरला, असे मरण पावलेल्या नवविवाहितेचं नाव आहे. मालंदी हिचा हदगाव नखाते गावातील मुनव्वर बेग याच्यासोबत आठ महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर मालंदीच्या वडिलांची दीड एकर शेतीसाठी सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला. त्यातुनच सोमवारी रात्री सासुने मालंदीवर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं. त्यात ती 92 टक्के भाजली होती. उपचारांसाठी तिला तातडीने परभणीच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचार सुरू असताना आज सकाळी तिचा मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी कालपासून फरार आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2016 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close