S M L

बॉक्स ऑफिसवरही नट'सम्राट'च, कमाईत 'लय भारी'ला टाकलं मागे

Sachin Salve | Updated On: Jan 27, 2016 04:58 PM IST

natsamrat posterमुंबई - 27 जानेवारी : 'नटसम्राट' या सिनेमाने 'लय भारी' या सिनेमाच्या कलेक्शनला मागे टाकत मराठीतला सर्वात जास्त कमाई करणार्‍या सिनेमाचा मान काबीज केला. या सिनेमाने चौथ्या आठवड्यात 35 कोटी 10 लाखांची कमाई करत 'लय भारी'च्या 35 कोटी कमाईचा विक्रम मोडीत काढला आहे.

नाना पाटेकर, विक्रम गोखले, मेधा मांजरेकर यांच्या अभिनयाने नटलेला हा सिनेमा रसिकप्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलाय. त्यामुळेच बॉक्स ऑफिस कलेक्शनचा उच्चांक गाठणं या सिनेमाला शक्य झालंय.

देशभरातील 190 थिएटर्समध्ये या सिनेमाचे 380 शोज सुरू आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली याठिकाणीही नटसम्राट प्रदर्शित झाला होता. या सगळ्याच ठिकाणी मराठी आणि अमराठी प्रेक्षकांनी या सिनेमाला आपल्या पसंतीची पावती

दिलीय. यापूर्वी 'दुनियादारी'ने 26 कोटी, 'टाईमपास'ने 32 कोटी, 'टाईमपास ट'ूने 28 कोटींचा गल्ला वसूल केला होता.मात्र, नटसम्राटने लय भारीला मागे टाकत बॉक्स ऑफिसवरही नट'सम्राट' ठरलाय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 27, 2016 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close