S M L

सेनेच्या विरोधामुळे गुलाम अलींचा आणखी एक कार्यक्रम रद्द

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2016 09:07 AM IST

Gulam ali and shivsenaमुंबई -28 जानेवारी : जगप्रसिद्ध गझल गायक गुलाम अलींचा मुंबईतला कार्यक्रम पुन्हा रद्द झालाय. उद्या शुक्रवारी हा कार्यक्रम होणार होता.

सुहेब इल्यासी यांच्या चित्रपटाचं म्युझिक लाँच होतं, आणि त्यासाठी गुलाम अली येणार होते. पण कार्यक्रमाच्या आयोजकांशी सेनेच्या चित्रपट सेनेनं संपर्क साधला, आणि कार्यक्रम रद्द करायला भाग पाडलं, असं चित्रपटाचे निर्मीते सुहेब इल्यासी म्हणाले.

याआधीही गुलाम अलींचा कार्यक्रम मुंबईत होणार होता. पण, शिवसेनेनं कडाडून विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द झाला होता.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2016 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close