S M L

भुजबळांच्या एमईटीला दिलासा मिळणार का ?, आज सुनावणी

Sachin Salve | Updated On: Jan 28, 2016 09:16 AM IST

भुजबळांच्या एमईटीला दिलासा मिळणार का ?, आज सुनावणी

मुंबई - 28 जानेवारी : माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांची वांद्र्यामध्ये मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या (एमईटी) शेजारी असलेली पाच हजार चौरस फूट जागा परत करण्याबाबत पालिकेने बजावलेल्या नोटिशीविरोधात ट्रस्टने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र न्यायालयाने ट्रस्टला अंतरिम दिलासा देण्यास नकार देत प्रकरणाची सुनावणी आज ठेवली आहे.

महापालिकेला जागा परत मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे संस्थेला जागा ताब्यात ठेवता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केलं. परंतु, याचिकाकर्त्यांना अर्जावर सुनावणी हवी आहे की त्यांना जागा परत करण्यास मुदतवाढ हवी आहे, असे पर्याय न्यायालयाने एमईटी आणि नागपाडा येथील ट्रस्टसमोर ठेवत सुनावणी गुरुवारी ठेवली आहे. खेळाची मैदाने आणि उद्यानांबाबत पालिकेने नवी योजना आखली असून त्यानुसार मुंबईतील 36 विविध संस्थांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसंच जागा परत करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. यात भुजबळांच्या एमईटीचाही समावेश आहे. त्यामुळे भुजबळांच्या एमईटीला दिलासा मिळतो का याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 28, 2016 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close