S M L

रोज 'मरे', मध्य रेल्वेची वाहतूक स्लो ट्रॅकवर

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2016 09:06 AM IST

mumbai-localsमुंबई - 29 जानेवारी : 'रोज मरे त्याला कोण रडे' आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ऐन गर्दीच्या वेळेस मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती, आता ती धीम्या गतीनं सुरू झाली आहे.

आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आता इंजिनाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे कसार्‍याकडे जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. आसनगावजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे कसार्‍याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

सकाळी सात वाजेपासून विस्कळीत झालेली ही वाहतूक आता धीम्या गतीनं सुरू झाली आहे. काहीकाळ लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलवर याचा परिणाम झाला होता. आता वाहतूक धीम्यागतीने सुरू असून आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2016 09:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close