S M L

पूर्वी शनी चौथर्‍यावर जाऊन महिला दर्शन घेत होत्या, मग आता का नाही ? - विखे पाटील

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2016 09:17 AM IST

Vikhe patilअहमदनगर - 29 जानेवारी : शनी शिंगणापूरला पूर्वी महिला चौथर्‍यावर जात असल्याची चर्चा आहे, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय. त्यामुळे चौथर्‍यावर महिलांना प्रवेश मिळाला पाहिजे अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे. ते अहमदनगरला बोलत होते.

विश्वस्त मंडळ नेमण्याचा अधिकार धर्मादाय आयुक्तना असून मुख्यमंत्र्यांकडे हे खातं आहे. त्यामुळं त्यांनी चौकशी करणे गरजेचं होतं. मात्र सरकारनं पुढाकार घेण्याऐवजी जिल्हा प्रशासनवर जबाबदारी सोपवली. त्याचबरोबर धर्मादाय आयुक्त कारवाई करुन निलंबित करण्याची मागणीही विखे पाटील यांनी केलीय. विश्वस्त नेमणुकीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. इतकंच नाही तर सर्वच प्रमुख देवस्थानाचं व्यवस्थापन राज्य सरकारनं आपल्या हाती घ्यावं असंही त्यांनी सुचवलंय. मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक चौथर्‍यावर जाऊन दर्शन घ्यावं अशी मागणी भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केली आहे, त्यालाही विखे पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2016 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close