S M L

आम्हालाही हाजी अली दर्ग्यात जाऊ द्या, मुस्लिम महिलांची मागणी

Sachin Salve | Updated On: Jan 29, 2016 12:35 PM IST

आम्हालाही हाजी अली दर्ग्यात जाऊ द्या, मुस्लिम महिलांची मागणी

मुंबई - 29 जानेवारी : शनी शिंगणापूरमध्ये शनी चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेऊ द्या अशी मागणी करत महिलांनी आंदोलन छेडले आहे. आता या आंदोलनाचे लोण पसरत असून मुंबईतील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश द्या अशी मागणी आता होऊ लागली आहे.

शनी शिंगणापूरच्या आंदोलनानंतर आता मुंबईतल्या मुस्लिम महिलाही सक्रिय झाल्या आहेत. हाजी अली दर्ग्यामध्ये महिलांना आतपर्यंत म्हणजेच 'मजार' (गाभारा)पर्यंत जाऊ द्यावं यासाठी आझाद मैदानावर महिलांनी आंदोलन केलं. दर्ग्याच्या गाभार्‍यामध्ये महिलांना प्रवेश नसावा, असं कुराणात कुठेही लिहिलेलं नाही, पुरुष मानसिकतेमुळे हे नियम बनवले गेले आहेत, असं या महिलांचं म्हणणं आहे. महिलांना दर्ग्यात प्रवेश देण चुकीचं आहे. असं सांगत हाजी अली ट्रस्टने 2011 मध्ये महिलांना प्रवेश बंदी केली होती. एवढंच नाहीतर याबाबतचा खटलाही मुंबई हायकोर्टात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2016 09:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close