S M L

वसईतल्या भोंदूबाबा प्रकरणी आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या दोघांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Feb 1, 2016 12:30 PM IST

Vasai sadha

वसई - 01 फेब्रुवारी : वसईच्या भोंदूबाबाप्रकरणी अखेर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली असून या प्रकरणी आतापर्यंत 2 जणांना अटक झाली आहे. विष्णू कुडवे आणि वैभव तरे अशी त्याचे नावं आहेत. यापैकी विष्णू कुडवे हा आशीर्वाद प्रार्थना केंद्राचा व्यवस्थापक आहे. याच प्रार्थना केंद्रामध्ये भोंदूबाबा सबॅस्टियन मार्टिन बरं करण्याच्या नावाखाली लोकांना फसवत असे. या भोंदूबाबाचा पर्दाफाश केल्यापासून IBN लोकमतने सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करत आहे. त्याच पार्श्वभूमीपर या कारवाया होत आहेत. आता सबॅस्टियन मार्टिनला अटक कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

वसईमध्ये गेल्या 8 वर्षांपासून सॅबिस्टन मार्टिन या भोंदूबाबाने भोळाभाबड्या रुग्णांना असाध्य आजार बरे करण्याचे दुकान थाटले आहे. किडनी, मधुमेह, गुडघ्याचे आजार हात लावताच बरे केले जातील असा विश्वास तो रुग्णांना देतोय. असे अनेक व्हिडीओज गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियामध्ये फिरतायत. पण या व्हिडीओजच्या बरोबरीने या मार्टिनविरोधात फसवणुकीच्या तक्रारीही दाखल होतायत, हे लक्षात आलं. अखेर या भोंदूबाबाचा IBN लोकमतने पर्दाफाश करत सॅबिस्टन मार्टिनची भोंदूगिरी सर्वांसमोर आणली.

वसईतल्या या केंद्राजवळ राहणा-या रहिवाशांनी आयबीएन लोकमतचे आभार मानले आणि आपल्या व्यथा मांडल्या. याच केंद्रात उपचारासाठी गेलेल्या पण फसवणूक झालेल्या काही रुग्णांनीही आपले अनुभव सांगितले. त्यानंतर पालघरच्या एसपी शारदा राऊत यांनीही मग कारवाईचं आश्वासन देत या प्रकरणातली पहिली कारवाई केली. अंधश्रध्दा निर्मूलन समितीने तक्रार दाखल केली होती, त्या बळावर आशीर्वाद प्रार्थना केंद्राच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एवढचं नाही तर मुख्य सूत्रधार सबॅस्टिअन मार्टिनलाही लवकरच ताब्यात घेतलं जाईल असं आश्वासनही पोलिसांकडून दिलं जातं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 1, 2016 12:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close