S M L

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून समीर भुजबळांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Feb 2, 2016 03:04 PM IST

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 'ईडी'कडून समीर भुजबळांना अटक

मुंबई - 02 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला आहे. भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली आहे. पीटीआयय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली असून त्यांना थोड्याच वेळात सेशन्स कोर्टात हजर हजर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी ईडीने काल (सोमवारी) छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांशी संबंधित राज्यभरात नऊ ठिकाणी छापे मारले होते. भुजबळ कुटुंबियांची काही घरं आणि कार्यालयांचा यामध्ये समावेश आहे. याआधीही महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी समीर आणि पंकज भुजबळ यांना ईडीकडून समन्स धाडण्यात आले होते. तरीही दोघे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले नाहीत. अखेर सोमवारी दुपारी समीर भुजबळ मुंबईतील बलार्ड इस्टेट इथल्या ईडीच्या कार्यालयात हजर झाले. त्यानंतर ईडीकडून झालेल्या 9 तासांच्या चौकशीनंतर अखेर समीर यांना अटक करण्यात आली. समीर भुजबळ यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

दरम्यान, छगन भुजबळ मुंबईत नसून ते अमेरिकेत गेल्याची माहिती मिळत आहे. अमेरिकी काँग्रेसने सामाजिक न्याय या विषयावरील परिसंवादात ते सहभागी होणार आहेत. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा सुद्धा उपस्थित राहणार आहे. 4 फेब्रुवारीला वॉशिंग्टनमध्ये 140 राष्ट्रांतल्या प्रतिनिधींची परिषद होत आहे. यासाठी भुजबळ यांनाही विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2016 09:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close