S M L

समीर भुजबळांना 8 तारखेपर्यंत ईडीची कोठडी

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2016 10:53 PM IST

समीर भुजबळांना 8 तारखेपर्यंत ईडीची कोठडी

मुंबई - 02 फेब्रुवारी :राष्ट्रवादीचे बडे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांना सेशन्स कोर्टात हजर केलंय. पुढील चौकशीपर्यंत कोर्टाने त्यांना 8 तारखेपर्यंत कोठडी सुनावली आहे. त्यामुळे समीर भुजबळ 8 दिवस ईडीच्या ताब्यात राहणार आहे.

समीर भुजबळ यांच्यावर हवाला मार्गे काळा पैसा परदेशात पाठवल्याचा आरोप आहे. परदेशात खाण आणि पॉवर प्रकल्प असल्याचं सांगितलं होतं. तपासामध्ये हे सर्व प्रकल्प बोगस असल्याचं समोर आलंय. याच बोगस कंपन्यांनी हजारो कोटी भारतामध्ये गुंतवले. प्रत्यक्षात हा पैसा हवालामार्गे भारतामध्ये परत आणला असल्याचं तपासात आढळलंय. काल दिवसभरात खारघर, सांताक्रुझ आणि

विलेपार्लेतल्या 9 कार्यालयांची ईडीने तपासणी केली आणि अखेर समीर भुजबळांना अटक कऱण्यात आली. त्यांना बॅलार्ड पियर इथल्या ईडीच्या कार्यालयात ठेवण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2016 07:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close