S M L

पाठीत खंजीर खुपसले, भुजबळांची 'डीपी'तून वेदना

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2016 06:14 PM IST

पाठीत खंजीर खुपसले, भुजबळांची 'डीपी'तून वेदना

chagan_bhujbal_dpनाशिक - 02 फेब्रुवारी : व्हॉट्सऍपवर डीपी बदलण्याची चांगलीच क्रेझ आहे. एखादा आनंदाचा क्षण असो तर त्या क्षणाचा डीपी आपण लावतो. आणि जर दुखात असेल तर एखादा मजकूर असलेला किंवा फोटो आपण लावतो. त्याला आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सुद्धा अपवाद नाही. चौकशीचा फैरा आणि समीर भुजबळांच्या अटकेमुळे भुजबळांनी आपला डीपी आणि स्टेट्स बदलं असावं. कारण, त्यांनी पाठीत खंजीर खुपसणारी व्यक्ती सिगारेट ओढत आहे अशा आशयाचा डीपीच लावलाय.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ गैरव्यवहार प्रकरणामुळे पुरते हैराण झाले आहे. त्यांच्या मागे लागलेला ससेमिरा काही पिच्छा सोडण्यास तयार नाही. अशातच पुतणे समीर भुजबळांना अटक झाली. त्यामुळे भुजबळ चांगलेच नाराज झाले. त्यांची नाराजी बहुतेक त्यांच्या व्हॉटस्‌ऍप डीपीवरुन दिसून येत आहे. समीरच्या अटकेनंतर अमेरिका दौर्‍यावर अससेल्या छगन भुजबळांनी आपल्या व्हॉट्सऍपचा डीपी देखील बदलला आहे. त्यात त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याचं रेखाचित्रं टाकलंय. आणि "इस आदमी के दुष्मन हैं बहोत लोग..शायद ये आदमी अच्छा होगा..."असं स्टेट्सही त्यांनी टाकलंय.

विशेष म्हणजे भुजबळांनी सहा दिवसांपूर्वीच हा डीपी बदललाय. याचा अर्थ, ईडीच्या कारवाईबाबत भुजबळांना पूर्वकल्पना तर नव्हतीना अशीही शंका घ्यायला बराच वाव आहे...असो...खरं काय ते भुजबळांनाच माहित...दरम्यान, भुजबळांच्या याच डीपीवाबत पवारांना छेडलं असता त्यांनी मोठी मिश्किल प्रतिक्रिया दिलीये. खंजीर वाल्याचा हात बारीक की जाड हे तपासावं लागेल, अशी कोटीही पवारांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2016 06:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close