S M L

आरारा, दुसर्‍यांचे आजार बरे करणारा भोंदूबाबाच हॉस्पिटलमध्ये दाखल

Sachin Salve | Updated On: Feb 2, 2016 06:54 PM IST

Vasai bhondubaba1मुंबई - 02 फेब्रुवारी : वसईतला सुटाबुटातला भोंदूबाबा सबॅस्टियन मार्टिन ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल झालाय. सामान्य जनतेला येशू ख्रिस्ताच्या नावाने बरं करण्याचा दावा करणारा हा भोंदू बाबा स्वत:ला मात्र बरं करू शकलेला नाही आहे.

इतरांना बरं करण्याचा दावा करणारा हा भोंदू बाबा स्वत:च्या आजारासाठी डॉक्टरांची मदत घेतोय. त्यामुळे या भोंदूबाबाचा ढोंगीपणा उघड झालाय. यावेळी आयबीएन लोकमतने या भोंदू बाबाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. पण, या भोंदूबाबाच्या कार्यकर्त्यांनी आयबीएन लोकमतच्या टीमला घेरून दमदाटी केली. आणि हॉस्पिटल परीसरात गोंधळ घातला. भोंदूबाबाला वाचवण्यासाठी त्याच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून हॉस्पिटलमधील इतर रुग्णांना देखील त्रास दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 2, 2016 06:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close