S M L

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर भाजपचा प्रभाव?

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2016 12:19 PM IST

BMC56y

मुंबई – 03 फेब्रुवारी : देशातल्या सर्वात श्रीमंत महानगर पालिकेचा म्हणजे मुंबई महापालिकेचा 2016-17 साठीचा अर्थसंकल्प आज (बुधवारी) सादर होणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेचा निवडणुकीच्या पुर्वीचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष आज पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे लागलं आहे.

दरम्यान, या बजेटवर भाजपचा प्रभाव दिसणार आहे. कारण महापालिकेतले शिवसेनेचे महत्वाचं नगरसेवक हे बजेटमध्ये तरतुदी करण्यावेळी अंदमानला अभ्यासदौर्‌यावर होते. भाजपने पुन्हा एकदा राजकीय दूरदृष्टी दाखवत दौर्‍याला जाण टाळलं आणि मनाप्रमाणे तरतुदीकरुन घेतल्या. त्यामुळे या अर्थसंकल्पावर पूर्णपणे केंद्र आणि राज्यातल्या भाजप सरकारचा प्रभाव दिसेल.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल 6000 कोटींचं वाढीव बजेट महापालिका प्रशासन सादर करणार आहे. त्यामुळे यंदा अर्थसंकल्प 36 हजार कोटींपर्यंत पोहोचणार असल्याची माहिती आहे. मागच्या वषच्चं बजेट खर्च करण्यासाठी फक्त दोन महिने बाकी असतानाही आतापर्यंत एकूण बजेटपैकी फक्त 25 टक्के रक्कमच खर्च झालेली आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये मुंबई पालिकेची निवडणूक असल्यामुळे कोणत्याही करात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पा विषयी बोलताना गेल्यावर्षीच्या अर्थ संकल्पाचं काय झालं हे जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण गेल्यावर्षीचा फक्त 25 टक्के अर्थसंकल्प वापरला गेलाय. त्यामुळे मुंबईकरांचे प्रश्न सोडवले गेले नाहीत, उलट ट्राफिक,आरोग्य या सारख्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.

गेल्या वर्षीचा अर्थसंकल्पचं काय झालं? - 31 हजार कोटी

- 12 हजार कोटी पगारावर खर्च

- अर्थसंकल्पात 11 हजार 823 कोटींच्या तरतुदी

- त्यापैकी फक्त 3 हजार 14 कोटी खर्च

- 75 टक्के रक्कम खर्चाविना

- रस्त्यांसाठी 3 हजार 207 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव

- त्यापैकी फक्त 1 हजार 111 कोटी खर्च

- पर्जन्यवाहिन्यांवर 1 हजार 105 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव

- त्यापैकी फक्त 233 कोटी खर्च

- मोठ्या रुग्णालयांसाठी 243 कोटींचा प्रस्ताव

- त्यापैकी 87 कोटीच खर्च झाले

- अग्निशमन दलासाठी 247 कोटींचा प्रस्ताव

- फक्त 44 कोटी रुपये खर्च

- विकास आराखड्यासाठी 515 कोटींचा प्रस्ताव

- त्यापैकी फक्त 13 कोटीच खर्च

कसा असेल मुंबईचा अर्थसंकल्प ?

- 37 हजार कोटीचा अर्थसंकल्प

- गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प होता 31 हजार कोटींचा

- स्वच्छतेवर आणि मुख्यत्वे कचर्‍याच्या वर्गीकरणावर भर दिला जाईल. काही नव्या योजना जाहीर होण्याची शक्यता

- महापालिकेकडे असणार्‍या 216 मोकळ्या भूखंडांबाबत नवं धोरण जाहीर होणार का हे पाहावं लागेल

- ईझी बिझनेसच्या धर्तीवर दुकानं आणि रेस्टॉरंटसाठी कमी परवान्यांची योजना येणार

- यावर्षी जकातीमधून पालिकेला जास्त उत्पन्न मिळणार. त्यामुळे बजेटमध्ये वाढ

- गेल्यावर्षीचा फक्त 25 टक्के अर्थसंकल्प वापरला गेलाय. त्यामुळे वर्षभरात सर्व महत्त्वाचे प्रकल्प रखडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close