S M L

लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात होणार हेल्मेट सक्ती - दिवाकर रावते

Samruddha Bhambure | Updated On: Feb 3, 2016 01:42 PM IST

Diwakar03 फेब्रुवारी :  संपूर्ण महाराष्ट्रात लवकरच हेल्मेट सक्ती करण्यात येणार असून, त्याची सुरूवात पुण्यातून करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.

रावते यांनी आज औरंगाबाद येथील एका चौकात हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्यानंतर पत्रकारंसोबत बोलताना राज्यात हेल्मेट सक्ती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केलं. हेल्मेट परिधान न केल्याने अनेक दुचाकीस्वारांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रावते यांनी राज्यात हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर दुचाकी विक्री करताना सोबत हेल्मेट देण्याचा प्रस्ताव असल्याचेही रावते यांनी या वेळी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 01:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close