S M L

निवडणुकीच्या नावानं चांगभलं, मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 10:17 PM IST

निवडणुकीच्या नावानं चांगभलं, मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस

मुंबई - 03 फेब्रुवारी : राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महापालिकेनं चालू वर्षाचा 37 हजार 52 कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय. आगामी पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधार्‍यांनी मुंबईकरांना खुश करण्यासाठी तिजोरीचे दार मोकळे केले आहे. मुंबईतील अधिकाधिक लोकसंख्या ही चाळी झोपड़पट्टी मध्ये राहते. येणार्‍या निवडणुकांचा विचार करता 9187. 95 कोटी रुपयांची भरघोस तरतूद केलीये.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता यांनी पुढील आर्थिक वर्षाचा 37 हजार 52 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला. पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असल्यामुळे मुंबईसाठी कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नसली तरी कच्च्या तेलावरील आयात कर वाढवल्यामुळे मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तर अर्थसंकल्पीय तरतुदींवर केंद्र आणि राज्य सरकारची छाप असल्याची चर्चा आहे.

विकास नियोजन खात्यातून 6284 कोटी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर महसुली उत्पन्नाचा 25,642 कोटींचा अंदाज वर्तवण्यात आला आणि खर्चाचा 25,640 कोटींचा अंदाज वर्तवण्यात आलाय.त्यामुळे मुंबईकरांवर याचा भार पडणार आहे. एवढंच नाहीतर मुंबई पालिकेनं सीएसटी स्टेशनवर करण्यात आलेल्या रोषणाई पालिकेच्या मुख्यालयावरही करण्यासाठी 10 कोटींची तरतूद केली. आणि महामार्गांवर महिला शौचालयासाठी फक्त 5 कोटींची तरतूद केल्याची तफावत आढळून आलीये. एवढंच नाहीतर चौपाट्या चकाचक करण्यासाठी चौपाट्यांवर विद्युत रोषणाईसाठी 20 कोटींची तरतूद केलीये.

 मुंबई अर्थसंकल्पातील तरतुदी

- नवीन बेस्ट बसेस खरेदी करण्यासाठी 10 कोटी रु. कर्ज

- गावठाण, कोळीवाडे, आदिवासी पाडे विकास - 27 कोटी रु.

- गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणेसाठी 100 कोटींची विशेष तरतूद

- सार्वजनिक शौचालयांसाठी 75 कोटी रु.

- महामार्गावर महिला शौचालयासाठी 5 कोटी रु.

- गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटी रु.

- अग्निशमन दल यंत्रसामुग्रीसाठी 246 कोटी रु.

- प्रत्येक विभागात ई-कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभारणार

- निवासी डॉक्टरांसाठी 3 नवी वसतीगृहं बांधणार

- मागाठाणे येथे थॅलेसेमिया उपचार केंद्रासाठी 4.87 कोटी रु.

- कोस्टल रोड - 12 हजार कोटी

- शहरांमधील रस्त्यांसाठी 2806.80 कोटी

- एलईडी दिव्यांसाठी 10 कोटी

- पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 1408.48 कोटी

- देवनार पशुगृहासाठी 137.95 कोटी

- कचर्‍याबद्दलच्या जनजागृतीसाठी 15 कोटी

- उद्यानांसाठी 523 कोटी

- घनकचरा व्यवस्थापनासाठी 2512.22 कोटी

- जल मलनिस्सारण- 1244 कोटी

- विकास नियोजन खात्यातून- 6284 कोटी मिळण्याचा अंदाज

- महसुली उत्पन्नाचा अंदाज- 25642 कोटी

- महसुली खर्चाचा अंदाज- 25640 कोटी

- गोरेगांव मुलुंड लिंक रोड--130 कोटी

- हँकॉक ब्रिजसाठी 10 कोटी

- पर्जन्य जलवाहिन्यांच्या सुधारणेसाठी 1408 कोटी

- मागाठणे येथे थैलेसेमिया उपचार केंद्राची स्थापना, 4.87 कोटी

- मानवी दुग्ध पेढ़ी प्रस्तावित

- निवासी डॉक्टरांसाठी 3 नविन वसतिगृह बांधली जाणार आहेत, त्यासाठी 5 कोटीची तरतूद 350 कोटीचा एकूण खर्च अपेक्षित

- बेस्टसाठी बसेस खरेदी करण्यासाठी 10 कोटी कर्ज देणार

- गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणेसाठी 100 कोटीची वेगळी तरतूद

- मुंबईतील अधिकाधिक लोकसंख्या ही चाळी झोपड़पट्टी मध्ये राहते. येणार्‍या निवडणुकांचा विचार करता 9187. 95 कोटी रुपयांची भरघोस तरतूद

- अग्निशमन दलासाठी यंत्रसामग्रीसाठी -246 कोटी

- प्रत्येक विभागात ई कचरा संकलन करण्यासाठी यंत्रणा उभारणार

- स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान 80 कोटी

- सीएसटी स्टेशन सारखी महापालिका इमारतीलाही विद्युत रोषणाई करणार -10 कोटी

- मुलुंड देवनार आणि कांजूर डंम्पिंग ग्राऊंडसाठी 28 कोटीची तरतूद

- डॉ आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीसाठी 1 कोटी

- केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढ़ाओ साठी 10 लाख

- महानगरपालिका पालिकेच्या मुख्यालयावर विद्युत रोषणाईवर 10 कोटी

2394 कोटींचा शिक्षण अर्थ संकल्प

- मिनी सायन्स सेंटरसाठी- 3.5 कोटी

- आरोग्यदायी प्रसाधनासाठी - 10 कोटी

- बालवाडीसाठी टॉय लायब्ररी- 1.76 कोटी

- व्होकेशनल ट्रेनिंग- 1.50 कोटी

- भगिनी शाळा नावाची नवी संकल्पना, दुसर्‍या शाळेतील शिक्षक येऊन शिकवणार

- शाळांच्या हाऊस किपिंगसाठी- 64 कोटी

- राज्य सरकारकडून 1257 कोटी अनुदानाची थकीत रक्कम येणे

- महापालिकेचा अजब न्याय!

-  महापालिका मुख्यालयाच्या विद्युत रोषणाईवर 10 कोटी रु.

- महामार्गांवर महिला शौचालयासाठी फक्त 5 कोटी रु.

-  चौपाट्यांवर विद्युत रोषणाईसाठी 20 कोटी रु.

- मुलुंड, देवनार, कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडसाठी 28 कोटी रु.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close