S M L

जात पंचायतीची हिटलरशाही, विधवेला पारदर्शक साडी नेसण्याचा फतवा

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 08:52 PM IST

जात पंचायतीची हिटलरशाही, विधवेला पारदर्शक साडी नेसण्याचा फतवा

कपिल भास्कर,नाशिक - 03 फेब्रुवारी: पुरोगामी राज्य म्हणार्‍या आपल्या राज्यात जातपंचातीकडून होणार अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहे आणि हे प्रकार पाहिल्यावर आपण कुठल्या राज्यात राहतो यांची शंका निर्माण होते. असाच एक प्रकार नंदुरबारमध्ये घडलाय. एका विधवा महिलेला पारदर्शक साडी नेसून 2 किलोमिटर चालण्याचा फतवा काढलाय. एवढ्यावरच हे पंच थांबले नाही, तर आगीत तापवलेल्या शेणाच्या गोर्‍या तिचा शरीरावर मारण्यात येणार आणि गावकर्‍यांकडून रुईच्या गरम लाकडाने तिला मारलं जाईल. हेच नाहीतर तिच्या मुलांच्या तळहातावर तापलेली कुर्‍हाड ठेवून त्यांना चालविण्यात येईल असा पापभीरू फतवा काढलाय. पंचाच्या या फतव्याला झुगारून या महिलेनं गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

बुरसटलेल्या समाजाची मानसिकता आता महिलांच्या जिवावर कशी उठली आहे याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधे समोर आला आहे. नंदुरबारमध्ये राहणार्‍या छाया तमायचेकर या महिलेचा चक्रावून टाकणारा प्रवास स्वता: त्यानी मांडला आहे. पंधरा वर्षांपुर्वी छाया यांचा विवाह सतिश तमायचेकर यांच्याशी झाला. संसार फुलला आणि छाया यानी दोन मुलाना जन्म दिला. दोन वर्षांपुर्वी छाया यांच्या पतीला देवाग्न्या झाली आणि सासु आणि दिराचा त्रास सुरू झाला. छायाच्या चारित्र्यावर संशय घेत सासु आणि दिराने जात पंचायतीला मध्यस्ती करायला लावली. कंजार भट समाजाच्या जात पंचायतीन मग छायाच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगायला सुरुवात केली.

कंजार भाट समाजाच्या पंच मंडळीनी छायाला चारित्र्य शुद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी अजब प्रकार करायला लावले. पंचांसमोर पातळ आणि पारदर्शक साडी नेसून 2 किलोमिटर चालण्याचा फर्मान देण्यात आला. चालत असताना जळत्या शेणाच्या गोर्‍या अंगावर मारणार आणि शेजारी उभ्या असलेल्या महिला रुईच्या लाकडाने मारणार असा हा विधी असल्याची माहिती पंच कमिटीने छायाला दिली. एवढंच नाही तर स्वता:च्या मुलाच्या तळहातावर जळती कुर्‍हाड ठेवून सात पावलं चालण्याचा विधी देखिल केला जाणार अस पंच कमिटीने सांगितला. मुलाला त्रास झाला तर तुझ्या चारित्रात खोट आहे. मात्र, मुलाला काहीच झाल नाही तर तुला माफ केलं जाईल असं सांगण्यात आलं.

सासू दीर आणि पंच कमिटीच्या जाचाला आणि धमक्याना कंटाळुन छाया आपल्या दोन लहान मुलांसोबत नाशिकला आपल्या माहेरी पळुन आली अशा पंच कमिटीवर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी अनिसं केली आहे.

छायाच्या सासुचा एक वेगळाच डाव होता. जात पंचायतीत असलेल्या आपल्याच एका नातेवाईकांशी छायाचा विवाह करण्याचा तिच्या डाव होता. मात्र, हा इसम वयान खूप मोठा असल्याने आणि त्याची एक पत्नी देखिल असल्याने छायाने या प्रस्तावाला विरोध केला. ज्यामुळे तिचा छळ सुरू झाला. जात पंचायत आणि सासुच्या छळाला कंटाळुन छायाने माहेरचा आश्रय घेतला असला तरी पंच कमिटीचा तगादा मात्र अद्यापही सुरूच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 06:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close