S M L

शिक्कामोर्तब, महापौर बंगल्यातच बाळासाहेबांचं स्मारक !

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 08:05 PM IST

शिक्कामोर्तब, महापौर बंगल्यातच बाळासाहेबांचं स्मारक !

मुंबई - 03 फेब्रुवारी : अखेर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात होणार यावर शिक्कामोर्तब झालंय.

महापौर बंगल्याची जागा बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी लवकरच ट्रस्टकडे सुपूर्द केली जाणार आहे. राज्य शासनाचं तसं पत्रच पालिका आयुक्तांकडे आलं होतं. त्यानंतर ही जागा ट्रस्टकडे सुपूर्द करण्याच्या प्रक्रिया सुरू झालीये. पण, महापौर कुठे राहणार हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यातच होईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केली होती. या घोषणेला आता वर्ष उलटले. बाळाबाहेब ठाकर यांची मागील महिन्यात जयंती झाली. त्यानिमित्ताने बाळासाहेबांचं स्मारक आता तरी होईल का असा प्रश्न शिवसैनिकांनी उपस्थिती केला गेला. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांचं स्मारक महापौर बंगल्यात उभारू नये असा कडाडून विरोध केला. पण, आता महापौर

बंगल्याच्या जागेवरच स्मारक होणार यावर शिक्कामोर्तब झालंय. तसंच महापौर बंगल्यालगत पार्क क्लब आहे. त्याचीही जागा घेता येईल असाही यामागचा हेतू आहे. पण आता महापौर बंगल्यात जर स्मारक होत असेल तर महापौर कुठे राहणार असा प्रश्न आता उपस्थित झालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 08:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close