S M L

भ्रष्टाचार थांबत नसेल तर लोकांनी कर का भरावा ?- कोर्ट

Sachin Salve | Updated On: Feb 3, 2016 09:05 PM IST

भ्रष्टाचार थांबत नसेल तर लोकांनी कर का भरावा ?- कोर्ट

नागपूर - 03 फेब्रुवारी : सरकारी तिजोरीतील पैशांची लूट जर सरकार थांबवू शकत नाही तर सामान्यांनी कर भरण्याचा विचार करावा असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केलं आहे.

अण्णाभाऊ साठे महामंडळात 385 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी दाखल याचिकेवरील निकालादरम्यान ही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. जर सरकार अशा पद्धतीने सामान्यांच्या पैशांची लूट सुरूच ठेवणार असेल तर करदात्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलंय. मातंग समाजासारख्या मागावसवर्गीय लोकांच्या आयुष्यात कोट्यवधी रुपये खर्च करूनही काही फरक पडला नाही. त्यामुळे आतापर्यंत खर्च झालेल्या पैशांची वसुली कशी करणार अशी चिंताही हायकोर्टाने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2016 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close