S M L

भोंगर्‍या उत्सवाची सांगता

5 फेब्रुवारीसातपुड्याच्या पर्वतराजीत आदिवासींनी पेटविलेल्या होळीने भोंगर्‍याची सांगता झाली. खार्‍या पाड्या इथे रात्रभर पारंपारिक ढोलासह डोंगरदर्‍यांतील आदिवासी ठेका धरतात.पावरा आणि बारेला या आदिवासी जमातींनी हा होळीचा जागर केला. वर्षातल्या या अखेरच्या महाकाय होळीचे आदिवासी संस्कृतीत अत्यंत महत्व आहे. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासींचे सर्व सामुदायिक व्यवहार या होळीपासूनच सुरु होतात. या महाकाय होळीची उभारणी एक महिन्यापासून केली जाते. जवळपास तीनशे ते चारशे पूर्ण झाडे या होळीत असतात. यंदाच्या होळीचा मानाचा दंडा फिरवणे आणि पुढच्या होळीपर्यंत या दांड्याचे जतन करणे ही येथील महत्वाची परंपरा आहे.मेळघाटात मेघनाथाची पूजा ढोल ताशांचा गजर...लयदार आदिवासी गाणी आणि त्यावर फेर धरुन नाचणं हे चित्र आहे..मेघनाथाच्या पूजेचे...होळीच्या तिसर्‍या दिवसापासून मेळघाटात मेघनाथाची पूजा सुरू होते...या पुजेत आदिवासी आपले नवस फेडतो... रावणाचा मुलगा मेघनाथ याची मेळघाटातील आदिवासी मनोभावे पूजा करतात...सध्या मेळघाटात मेघनाथाची पूजा चालू आहे.....होळीच्या तिसर्‍या दिवसापासून मेळघाटात बाजाराच्या दिवशी या पूजेचे आयोजन केले जाते. आदिवासी संस्कृतीत स्तंभ म्हणजे मेघनाथाचा पुतळा.. नवस फेडताना अदिवासी मेघनादाच्या या पुतळ्याला आलिंगन देतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2010 11:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2010 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close