S M L

भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात

Samruddha Bhambure | Updated On: Feb 4, 2016 09:53 AM IST

भुजबळ कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ?, चौकशीसाठी ईडीचं पथक नाशकात

नाशिक - 04 फेब्रुवारी : बेनामी मालमत्ता प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आपला तपास पुढे सुरू ठेवलाय. भुजबळ कुटुंबींयाच्या चौकशी करण्यासाठी इडीचं एक पथक आज (गुरूवारी) नाशिकमध्ये दाखल झालं आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असल्याचे सांगण्यात येतं आहे. दरम्यान समीर भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ मनमाड आणि नाशिकमध्ये सुरू झालेली निदर्शनं आजही होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सदनन आणि इतर प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने काळ्या पैशाविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यत राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, तसंच पंकज आणि समीर भुजबळ हे संचालक असलेल्या विविध कंपन्यांच्या कार्यालयांवर सोमवारी छापे टाकले होते. तब्बल 20 अधिकार्‍यांच्या पथकाने राज्यात 9 ठिकाणी हे छापे टाकले. 'महाराष्ट्र सदन' गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले समीर भुजबळ यांना 8 फेब्रुवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनाविण्यात आली आहे. सोमवारी रात्री ईडीकडून नऊ तासांच्या चौकशीत विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात समीर भुजबळ अपयशी ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 4, 2016 08:46 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close