S M L

सोनू निगमचं गाणं एअर हॉस्टेसना भोवलं!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 5, 2016 01:37 PM IST

सोनू निगमचं गाणं एअर हॉस्टेसना भोवलं!

मुंबई - 05 फेब्रुवारी : प्रसिध्द गायक सोनू निगमला विमानात गाण्याची परवानगी देणं जेट एअरवेजच्या 'त्या' दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचार्‍यांना चांगलंच महागात पडलं आहे. सोनू निगमला गायनाची परवानगी देणार्‍या 5 एअर हॉस्टेसवर कारवाई करण्यात आली असून, त्यांना निलंबित करण्यात आलेय.

4 जानेवारीला सोनू निगम जोधपूरहून मुंबईला जात होता. त्यावेळेस विमानातील काही प्रवाशांनी सोनूला गाण्याचा आग्रह केला होता. त्यावर विमानातील एअर हॉस्टेसनीही सोनूला विमानाच्या ऍड्रेस सिस्टिमवरून गाण्याची परवानगी दिली होती. नंतर सोनूने 'वीर झारा'मधलं 'दो पल रुका ख्वाबों का कारवां' आणि 'रिफ्युजी' चित्रपटातलं 'पंछी नदियां पवन के झोंके ' ही गाणी गायली. मात्र विमानात झालेल्या या घटनेचा व्हिडीओ काही प्रवाशांनी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे घडलेल्या गोष्टीचं गांभीर्य ओळखून डीजीसीएने विमान कंपनीला संबंधित कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

दरम्यान, विमानातील क्रूला गाण्यामुळे किंवा नृत्यामुळे निलंबित करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी एका खासगी एअरलाईनने विमानातील क्रूला 'बलम पिचकारी' गाण्यावर नृत्य करण्यामुळे निलंबित केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2016 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close