S M L

देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू - शरद पवार

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2016 06:45 PM IST

pawar_on_bjp_newsमुंबई - 04 फेब्रुवारी : या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो देशाला घातक आहे. हा देश सेक्युलर आहे. यासाठी देशविघातक शक्तीविरुद्ध एकत्र आलं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. असहिष्णूता मुद्यावर मुंबईत देशभरातील काही प्रमुख लेखक आणि प्राध्यापकांची मुंबईत बैठक झाली.

देशात असहिष्णूच्या मुद्यावर प्रमुख लेखक आणि प्राध्यापकांची मुंबईत एक बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सर्वच लेखकांनी इतिहासात होत असलेल्या बदलांवर चर्चा केली. हिंदू राष्ट्रनिर्मितीचा प्रयत्न कसा होतोय यावर चिंता व्यक्त केलीय.

काही वर्गाकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. यातून काही घटकांबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून या विषयावर इतिहासतज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली पाहिजे. सातत्यानं भेटलं पाहिजे. इतिहासाला वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न केला जातोय त्याविरोधात लिखाण केलं पाहिजे असं शरद पवारांनी म्हटलंय.

शनी-शिंगणापूर मध्ये चाललेल्या घटनेला फार महत्त्व देण्याची गरज नाही जो देव स्रीला प्रवेश नाकारतो त्या देवाला मी मानतच नाही असंही परखड मतही शरद पवारांनी व्यक्त केलं. तसंच यापुढे देशातील एक हजार अभ्यासक आणि इतिहासकारांची मोठी परिषद मुंबईत करणार असल्याचं पवार यांनी सांगितलंय.

तर देशात साहित्य, शालेय शिक्षण अभ्याक्रम करण्याच काम सुरू आहे. या सर्वांच्या विरोधात लढा उभारण्याची गरज असल्याचं मत इतिहासकारांनी या बैठकीत मांडलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2016 06:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close