S M L

पवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार

Sachin Salve | Updated On: Feb 5, 2016 10:53 PM IST

पवारांच्या आदेशाला हरताळ, भुजबळ समर्थक पुन्हा राडा करणार

नाशिक - 05 फेब्रुवारी : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुंटुंबियाभोवती ईडीने कारवाईचा फास आवळलाय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी भुजबळांच्या पाठीशी उभं राहतं राष्ट्रवादी आंदोलन करणार नाही असं जाहीर केलंय. पण, आता भुजबळ समर्थकांनी पवारांच्या आदेशाला हरताळ फासत रस्त्यावर पुन्हा उतरण्याचा निर्णय घेतलाय.

छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे नाशिक जिल्ह्यातील वजनदार नेते. पुतण्या समीर नाशिकचा माजी खासदार तर मुलगा पंकज हा नांदगाव-मनमाड चा आमदार. बेनामी मालमत्ता प्रकरणी समीर भुजबळला ईडीनं ताब्यांत घेतलं आणि भुजबळांच्या या अभेद्य गडाला खिंडार पडतंय की काय असं चित्र निर्माण झालं. अलीकडे छगन भुजबळ हे परदेशात तर दुसरीकडे मुलगा आमदार पंकज संपर्क क्षेत्राच्या बाहेर अशी वेळ भुजबळ कुटुंबियांवर सध्या आली आहे. आणि हे सरकारचं षडयंत्र असल्याचा थेट आरोप नाशिक राष्ट्रवादीनं केलाय. शहर,ग्रामीण,पदाधिकारी,जिल्हा परीषद सदस्य,आमदार यांच्या वेगवेगळ्या 4 बैठका आज या राष्ट्रवादी भवनात झाल्या. सरकारनं केलेले खोटे आरोप मागे घ्यावे,समीर भुजबळ यांना सोडावं नाहीतर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून राडा करेल असा निर्णय या बैठकीत झालाय. विशेष म्हणजे समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रवादी आंदोलन करणार नाही असं स्पष्ट केलं होतं. भुजबळ कुटुंबियांविरुद्ध ईडीनं आपल्या कारवाईचा धडाका सुरू केल्यानंतर नाशिकमधील हे राष्ट्रवादी भवन आंदोलनाचं केंद्रबिंदू झालंय. त्यामुळे आता भुजबळ समर्थकांनी पवारांच्या आदेशाला हरताळ फासत आता आक्रमकपणे आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 5, 2016 10:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close