S M L

IPL लिलाव - वॉटसन, युवी ठरले सर्वात महागडे खेळाडू

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 03:06 PM IST

IPL लिलाव - वॉटसन, युवी ठरले सर्वात महागडे खेळाडू

नवी दिल्ली- 06 फेब्रुवारी : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या नवव्या सिझनसाठी आज खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. लिलावात शेन वॉटसन आणि अष्टपैलू युवराज सिंग सर्वात महाग खेळाडू ठरला.

शेन वॉटसनवर तब्बल 9 कोटी 50 लाखांची बोली लावत बंगलोर टीमने विकत घेतलंय. त्यापाठोपाठ हैदराबाद संघाने 7 कोटींची बोली लावत युवराज सिंगला तर आशिष नेहराला 5.5 कोटीला विकत घेतलं. तर पुणे टीमनं इंग्लंडच्या केविन पीटरसनला साडे 3 कोटी रुपयांत तर ईशांतसाठी 3 कोटी 80 लाख रुपयांची बोली लावत विकत घेतलं.  एकूण 315 खेळाडूंसाठी हा लिलाव झाला.

खेळाडूंची कोटीच्या कोटी उड्डाणं

शेन वॉटसन - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर - 9.5 कोटी

स्टुअर्ट बिन्नी - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुर - 2 कोटी

युवराज सिंग - हैदराबाद सनराईजर्स - 7 कोटी

आशिष नेहरा - हैदराबाद सनराईजर्स - 5.5 कोटी

ईशांत शर्मा - पुणे सुपर जाएंट्स - 3.80 कोटी

इरफान पठाण - पुणे सुपर जाएंट्स - 1 कोटी

केविन पीटरसन - पुणे सुपर जाएंट्स - 3.50 कोटी

मिचेल मार्श - पुणे सुपर जाएंट्स - 4.80 कोटी

ख्रिस मॉरिस - दिल्ली डेअरडेविल्स - 7 कोटी

ब्रॅथवेट - दिल्ली डेअरडेविल्स - 4.20 कोटी

संजू सॅमसन - दिल्ली डेअरडेविल्स - 4.2 कोटी

दिनेश कार्तिक - गुजरात लायन्स - 2.30 कोटी

स्मिथ - गुजरात लायन्स - 2.30 कोटी

डेल स्टेन - गुजरात लायन्स - 2.30 कोटी

मोहित शर्मा - किंग्ज इलेव्हन पंजाब - 6.50 कोटी

मार्कस स्टॉइनिस - किंग्ज इलेव्हन पंजाब - 50 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close