S M L

सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात सातार्‍याचे सुनिल सुर्यवंशी शहीद

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 03:13 PM IST

सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात सातार्‍याचे सुनिल सुर्यवंशी शहीद

सातारा - 06 फेब्रुवारी : सियाचीनमध्ये हिमस्खलनात गस्त घालणारे 10 भारतीय जवान हिमकडयाखाली गाडले गेल्यामुळे शहीद झाले. यामध्ये सातारा जिल्हयातील कुकुडवाड जवळील मस्करवाडी गावचे सुनिल विठ्ठल सुर्यवंशी यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती समजताच मस्करवाडी गावावर शोककळा पसरली आहे.

सियाचीनमध्ये बुधवारी झालेल्या हिमस्खलनात 10 जवान बेपत्ता झाले होते. जवानांना वाचवण्यासाठी 40 तास युद्धापातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू होतं. अखेर गुरुवारी बेपत्ता झालेले जवान शहीद झाल्याची दुदैर्वी घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून जवानांच्या धैर्याला सलाम करत त्यांना वीरमरण आल्याची माहिती दिली. जवानांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत सियाचीनमध्ये झालेला अपघात अतिशय दु:खद होता, असंही पंतप्रधान म्हणाले. भारतीय लष्कराची एक तुकडी 5800 मीटर म्हणजेच 19 हजार फूट उंचीवर गस्त घालत होती, त्यावेळी हिमकडा कोसळल्याने बर्फात दहा जवान अडकले होते. यातील एक जवान हा सातारा जिल्ह्यातील कुकुडवाड जवळील मस्करवाडी गावचा आहे. या घटनेची माहिती समजताच मस्करवाडी गावावर शोककळा पसरली आहे. सुनिल विठ्ठल सुर्यवंशी असं या जवानाचं नाव आहे. सुनिल यांच्या पश्चात आई,वडिल,पत्नी एक वर्षाची मुलगी एक भाऊ असा परिवार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 03:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close