S M L

अंदमान अभ्यासदौरा 'इम्पॅक्ट', मुंबई पालिकेनं वर्षभरातले सर्व दौरे केले रद्द

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 04:39 PM IST

bmcमुंबई - 06 फेब्रुवारी : अंदमान अभ्यासदौरा वादात सापडल्याने मुंबई महापालिकेनं येत्या वर्षभरातले सर्व अभ्यासदौरे रद्द केले आहे. मुंबईत गेले काही दिवस नगरसेवकांच्या अभ्यासदौर्‍याचा विषय गाजतोय. अंदमानला गेलेल्या नगरसेवकांवर झालेल्या टिकेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आधीच सर्व दौर्‍यांना जाणं रद्द केलं होतं. समाजवादीचे नगरसेवक हे देवनारच्या आगीमुळे त्रस्त आहेत. त्यात आता भाजपनही कुठल्याच दौर्‍याला जाणार नसल्याचं सांगितलंय. त्यामुळे या अभ्यासदौर्‍यासाठी जाण्यास सेना आणि मनसे वगळता कुणीही तयार नाही. म्हणून यावर्षीचे अभ्यासदौरेच रद्द केले गेले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close