S M L

पोलीस अधिकार्‍याचे हात भाजले

6 फेब्रुवारीअहमदनगर शहरात लँड माफियांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये लँड माफियांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पण हा पुतळा विझवण्याच्या प्रयत्नात चंद्रकांत सावंत या पोलीस अधिकार्‍याचे हात पोळले आहेत.सावंत पुतळयाची आग विझवण्याची प्रयत्न करत होते, त्याचवेळी एका आंदोलनकर्त्यांने पेट्रोल टाकले.त्यामुळे आग अधिकच भडकली आणि सावंत यांचे हात भाजले. यानंतर सावंत यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर आंदोलकांना अटक करण्यात आली. अहमदनगर शहरात सध्या आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाच्या जमिनी लँडमाफियांकडून बळकवल्या जात आहेत. या सगळ्याच्या विरोधात पिपल्स हेल्प लाईन या संस्थेच्या आणि इतर समाजसेवी संस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यातच ही घटना घडली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2010 10:00 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2010 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close