S M L

आघाडीवरून राष्ट्रवादीत मतभेद

अमेय तिरोडकर, गणेश वायकर6 फेब्रुवारीराष्ट्रवादी काँग्रेसला नवी मुंबई आणि औरंगाबाद या दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता मिळवायची आहे. त्या ठिकाणच्या राजकारणासाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठीच शरद पवारांच्या उपस्थितीत आज मुंबईत पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची बैठक होत आहे.नाईकांना स्वबळावर आत्मविश्वासयावेळी महापालिकांच्या निवडणुकीत काँग्रेसशी युती करायची की नाही यावरून राष्ट्रवादीची गोची झाली आहे. नवी मुंबईत पक्षाची एकछत्री सत्ता आहे. गणेश नाईकांना येथील सत्तेमध्ये काँग्रेसला वाटा द्यायचा नाही. स्वबळावर सत्ता आणणे हा त्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा पण औरंगाबादची परिस्थिती वेगळी आहे. पक्षाने येथील जबाबदारी दिली आहे, ती अजित पवारांकडे. त्यामुळे औरंगाबाद जिंकणे अजितदादांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. काँग्रेसशी आघाडी केली तरच औरंगाबादमधला सेनेचा गड ढासळू शकतो. त्यामुळेच इथे आघाडीसाठी राष्ट्रवादीकडूनच प्रयत्न केले जात आहेत. पुणे पॅटर्ननंतर काय?सेना भाजप आणि राष्ट्रवादी युतीचा पुणे पॅटर्न तोडल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादी यापुढे निवडणुकांना एकत्र सामोरे जातील असे सांगितले गेले होते. त्यानंतरच्या पहिल्याच महापालिका निवडणुकांत आघाडीवरून राष्ट्रवादीत असे स्पष्ट मतभेद पडलेले दिसत आहेत. सत्तेच्या वाट्यावरून मतभेदकाँग्रेससोबत एका ठिकाणी सत्तेचा वाटा हवाअसेल तर दुसर्‍या ठिकाणी तसाच वाटा काँग्रेसला द्यावा लागेल. सत्तेच्या वाट्यात किती ठिकाणी काँग्रेस सोबत असावी यावरच राष्ट्रवादीतले हे भांडण आहे. यातूनच आता आघाडी झाली तर धर्मनिरपेक्षतेचे बिगुल वाजवायचे आणि नाही झाली तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला म्हणून सांगायचे, अशी कारणेही पक्षाने तयार ठेवल्याची चर्चा आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2010 10:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2010 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close