S M L

महिलांना शनीदर्शनाचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Sachin Salve | Updated On: Feb 6, 2016 09:40 PM IST

महिलांना शनीदर्शनाचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

अहमदनगर - 06 फेब्रुवारी : शनी मंदिराच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश द्यायचा की नाही हा गुंता अजूनही सुटलेला नाही. या वादावर देवस्थान आणि भूमाता ब्रिगेडची बैठक तोडग्याविनाच संपलीये. आता याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच घ्यावा अशी मागणी करत चेंडू मंत्रालयात टोलवण्यात आलाय.

शनी मंदिराच्या चौथर्‍यावर चढून एका महिलेनं दर्शन घेतल्यानंतर महिलांना प्रवेश दिला जावा अशी मागणी जोर धरू लागली. पण,शनैश्वर देवस्थान आणि गावकर्‍यांना याला कडाडून विरोध केला. अलीकडेच भूमाता ब्रिगेडच्या महिलांना शनीदर्शनसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केल्यानंतर देवस्थानने भूमाता ब्रिगेडसोबत चर्चेची तयारी दाखवली. आज यावर बैठक पार पडली. पण, कोणताही तोडगा निघाला नाही. चौथर्‍यावर दर्शन न देण्यासंदर्भात गावकरी ठाम आहेत. तर यावर मुख्यमंत्र्यांनीच अंतिम निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचंही गावकर्‍यांनी सांगितलंय.

तर शनी चौथर्‍याच्या दर्शनासंदर्भात काही तोडगा निघाला नाही. पण, आम्हाला दर्शन मिळेल अशी अपेक्षा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलीये. आता मुख्यमंत्री महिलांना शनीदर्शनासाठी परवानगी देऊन पुरोगामी महाराष्ट्राला साजेशीर निर्णय घेता का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 6, 2016 09:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close