S M L

अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

Samruddha Bhambure | Updated On: Feb 7, 2016 03:29 PM IST

अंधेरीत गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार

मुंबई – 07 फेब्रुवारी : अंधेरीत पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर संदीप गाडोली चकमकीत ठार झाला आहे. एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये ही चकमक झाली.

संदीप गाडोली हा उत्तर प्रदेशातील गुरगावचा कुख्यात गँगस्टर होता. त्याच्यावर हत्येच्या आरोपासह अनेक गुन्ह्यांची नोंद होती. तसंच, त्याच्यावर 1.25 लाखांचं इनामही जाहीर झालं होतं.

संदीप हा मुंबईत लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हरयाणा पोलिसांच्या क्राईम ब्रँचचं एक पथक इथे आलं होतं. तेव्हा तो एमआयडीसी भागातील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची खबर पोलिसांनी मिळाली. दरम्यान, पोलीस संदीपच्या रुमवर अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. त्यावेळी प्रत्यूत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संदीप ठार झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 7, 2016 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close