S M L

मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, अनंत गीतेंचा अजब दावा

Sachin Salve | Updated On: Feb 8, 2016 09:55 AM IST

anant_geeteइंदापूर - 08 फेब्रुवारी : मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही असा अजब दावा केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी केलाय. ते इंदापुरात बोलत होते.

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी यंत्रापेक्षा मंत्राचे महत्त्व जास्त आसल्याचे सांगितलंय. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्या बाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. अनंत गीते इंदापूर येथील एका कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी कार्यक्रमाच्या निवेदकानं मंत्राला शरण जाण्यापेक्षा यंत्राला शरण जायाला हवं, असे वक्तव्य केलं.

या नंतर गीते त्यांच्या भाषणाला उभे राहिल्यानंतर त्यानी त्या निवेदकाला त्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली. मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू होत नाही, असाही दावा अनंत गीतेनी केला. एका अर्थाने यंत्रा पेक्षा मंत्राचे महत्व अधिक आसल्याचं सांगितलं. त्यामुळे अनंत गीते यांचं हे वक्तव्य अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे आहे का असा ही प्रश्न उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 8, 2016 09:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close