S M L

उड्डाणपुलांखालचं पार्किंग बंद करा, हायकोर्टाचे पालिकांना आदेश

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2016 11:23 AM IST

उड्डाणपुलांखालचं पार्किंग बंद करा, हायकोर्टाचे पालिकांना आदेश

मुंबई - 09 फेब्रुवारी : मुंबईमध्ये उड्डाणपुलांच्या खालचं पार्किंग हटवण्यासाठी हायकोर्टाने महापालिकांना 3 महिन्यांची मुदत दिलीये. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांना हा आदेश लागू होणार आहे.

शौकत अली आणि मोहसीन शेक यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर ही सुनावणी करताना न्यायमूर्ती ए एसओका आणि न्यायमूर्ती सी व्ही भडंग यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. 2008 साली सरकारने उड्डाणपुलाखाली पार्किंग करणं धोकादायक आहे, असं म्हटलं होतं. त्याचा आधार हायकोर्टाने हा आदेश देताना दिलाय. जर सरकारला आपला निर्णय बदलायचा असेल, तर त्यांनी तो बदलावा आणि नव्याने कोर्टात यावं, असं खंडपीठाने म्हटलंय. या आदेशामुळे आता मुंबईत पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close