S M L

पंकज भुजबळ यांची ईडीकडून 8 तास चौकशी

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2016 09:08 PM IST

पंकज भुजबळ यांची ईडीकडून 8 तास चौकशी

Pankaj bhujbal12

मुंबई - 09 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी समीर भुजबळांच्या पाठोपाठ आता पंकज भुजबळ यांची आज ईडीच्या मुंबई कार्यालयात तब्बल 8 तास कसून चौकशी झाली. ईडीने पंकज भुजबळांना कालच समन्स बजावलं होता. त्यानुसार, आज त्यांची चौकशी करण्यात आली.

दरम्यान, ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य केल्याचं पंकज भुजबळ यांनी सांगितलं. तसंच ईडीनं बोलावलं तर पुन्हा चौकशासाठी येईन, असंही ते म्हणाले. उद्या समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांची समोरासमोर चौकशी होण्याचीही शक्यता आहे. भुजबळ कुटुंबियांच्या अचडणीत आणखीन वाढ झाली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ तीन कंपन्यांमध्ये पैशांची अफरातफर आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटकेत आहेत. त्यांच्यानंतर पंकज भुजबळही ईडीच्या रडारवर होते. नाशिकमध्ये चौकशी केल्यानंतर ईडीने पंकज यांना समन्स बजावलं होतं. समीर आणि पंकज भुजबळ हे दोघेही अनेक कंपन्यांचे संचालक आहे. कंपनीच्या शेअर्सची फक्त कुटुंबातच मालकी आहे. चक्रावून टाकतील अशा प्रकारे शेअर्सच्या दरात वाढ केली आहे. या कंपनीच्या खात्यातून लाखोंच्या रक्कमेचं ट्रान्सफर व्यवहार झाला आहे. यातले अनेक व्यवहार संशयास्पद असून परदेशातही मोठी गुंतवणूक केली आहे. एवढंच नाहीतर मोठ्या प्रमाणात कर बुडवल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. प्रत्येक व्यवहाराला समीरसोबत पंकजही जबबादार असल्याचं संशय ईडीला आहे. त्यामुळेच आज पंकज यांची चौकशी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 06:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close