S M L

भारताचे संरक्षण शास्त्रज्ञं होतं टार्गेट, हेडलीचा खुलासा

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2016 10:00 PM IST

headley32मुंबई - 09 फेब्रुवारी : 26/11 मुंबई हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवादी डेव्हिड हेडलीची आज (मंगळवारी) दुसर्‍या दिवशीही साक्ष नोंदवण्यात आलीये. आज त्याने ताज हॉटेलमध्ये भरवण्यात आलेल्या भारताच्या संरक्षण शास्त्रज्ञांची परिषद लष्कर-ए-तोयबाच्या टार्गेटवर होती. या शास्त्रांना ठार मारण्याचा डाव आखण्यात आला होता असा गौप्यस्फोट केलाय. तसंच मुंबईत प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिराचे फोटो आयएसआयला पाठवले होते असा खुलासाही त्याने केला.

डेव्हिड हेडलीची आजही मुंबई मोक्का कोर्टात अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष नोंदवण्यात आली. पहिल्यादिवशी त्याने लष्कर ए तोयबा आणि आयएसआयचा 26/11 च्या मागे हात असल्याचं कबूल केलं. आज त्याने आणखी काही धक्कादायक खुलासे केले. मुंबईत 26/11 हल्ल्याची रेकी करण्यासाठी आलो होतो तेव्हा आयएसआयचा हस्तक साजिद मिर यानं मला सिद्धीविनायक मंदिराचे फोटो आवर्जून काढ असं सांगितलं होतं. तसंच ताज आणि ओबेरॉय हॉटेल, सीएसटी, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आणि कुलाब्याची मी नीट पाहणी केली. ताज हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावर आपण वास्तव्यास होतो असंही त्यांनी सांगितलं.

हेडली पुढे म्हणतो, ताज हल्ल्याचं कारस्थान मुझफ्फराबादमध्ये झालं. ताज हॉटेलच्या मोठ्या कन्व्हेन्शन रुमबद्दल बरीच चर्चा झाली होती. याचं कारण म्हणजे तिथे भारताच्या संरक्षण शास्त्रज्ञांची एक परिषद भरणार होती. हा परिषदेवर हल्ला करण्याची योजना होती. पण, तिथे दारूगोळा नेण्यात अडथळे येतील असं वाटल्यामुळे कन्व्हेन्शन सेंटरवर हल्ला करण्याचं कारस्थान रद्द झालं असा गौप्यस्फोट हेडलीने केलाय. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबूल मुजाहिद्दीन आणि हरकत उल मुजाहिद्दीन हे सर्व पाकव्याप्त काश्मीरमधल्या युनायटेड जिहाद काऊंसिलचा भाग आहेत, असंही हेडली म्हणाला.

तो पुढे म्हणतो, 26/11 2008 च्या हल्ल्याचं कारस्थान नोव्हेंबर 2007 मध्ये झालं होतं. लष्कर-ए-तोयबाच्या झकी उर रहमान लखवीनं हे कट कारस्थान रचले होते. लष्कर ए तोयबा हल्ल्याबाबतच्या प्रत्येक निर्णयासाठी आयएसआयला विचारायचं. यासाठी भारतीय लष्करात हेरगिरी करण्यासाठी जवान आणि अधिकार्‍यांना फितूर करण्याचे आदेश आयएसआयच्या मेजर इक्बालनं दिले होते. तसंच पाकिस्तानचा निवृत्त लष्करी अधिकारी मेजर पाशा हा लष्कर ए तोयबाशी संबंधित होता. तिथे तो दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण द्यायचा. त्यानं शेवटी अल कायदामध्ये शिरकाव केला अशी माहिती हेडलीने दिली. हेडलीच्या या माहितीवरून पाक लष्कर आणि दहशतवादी संघटना यांच्यातलं जवळचं नातं यावरून उघड होतंय. दरम्यान, 26/11 हल्ला प्रकरणी दोषींना शिक्षा देण्यात अमेरिका भारताला जमेल तेवढी मदत करणार, असा पुनरुच्चार अमेरिकेनं केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close