S M L

छगन भुजबळांच्या समर्थकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

Sachin Salve | Updated On: Feb 9, 2016 08:09 PM IST

छगन भुजबळांच्या समर्थकांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

मुंबई - 09 फेब्रुवारी : महाराष्ट्र सदन घोटाळा आणि गैरव्यवहार प्रकरणामुळे गोत्यात आलेले राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ अमेरिकेतून भारतात परतले आहे. अपेक्षेप्रमाणे मुंबई विमानतळावर भुजबळ समर्थकांनी एकच घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी विमानतळावर जाऊन भुजबळांचं स्वागत केलं.

यावेळी भुजबळांनी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. शरद पवारांचा आशीर्वाद पाठीशी आहे. आणि आपण कोणतीही चूक केली नसून कायदेशीर प्रक्रियेला समोर जाणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. तसंच सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी शांत राहण्याचं आणि कायदा हातात न घेण्याचं आवाहनही केलं. त्यानंतर भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात गेले. तिथंही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. तिथं पत्रकार परिषदेनंतर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 02:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close