S M L

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

Samruddha Bhambure | Updated On: Feb 9, 2016 09:20 PM IST

हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेशासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

मुंबई – 09 फेब्रुवारी : हाजीअली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी महाराष्ट्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. मशिदीत महिलांना प्रवेश मिळावा असं प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मुंबई हाय कोर्टात सादर केलं आहे.

हाजीअली दर्ग्यात मुस्लिम महिलांना प्रवेश दिला जात नाही. याविरोधात आवाज उठवत मुस्लिम महिलांच्या एका संघटनेने मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर राज्य सरकारने ही भूमिका घेतली आहे. त्यानुसार हाजी अली मशिदीत महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी सरकारने अनुकूलता दर्शविली आहे.

हाजी अली ट्रस्ट, दर्ग्याच्या आतल्या भागात महिलांच्या प्रवेशावर बंदी घालू शकत नाही, असं महाराष्ट्र सरकारने मुंबई हायकोर्टाला सांगितलंय. मशिदीमध्ये प्रार्थना करण्याची मुभा पुरुषांसोबत महिलांनाही असावी, असं सरकारचं म्हणणं आहे. पण या दर्गाच्या आतला भाग गर्दीचा असतो आणि त्यामुळे हा भाग म हिलांसाठी सुरक्षित नाही, असं ट्रस्टचं म्हणणं आहे.

दरम्यान, राज्य सरकारने मुस्लिम महिलांसह सर्व महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात आज हाय कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यावर 2 आठवड्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 9, 2016 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close