S M L

तांत्रिक अडचणीमुळे हेडलीची आजची साक्ष रद्द

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2016 11:31 AM IST

david_headley_2611मुंबई - 10 फेब्रुवारी : 26/11 हल्ल्यामधला प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या डेव्हिड हेडलीची आजही साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आलीये. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे आजची साक्ष रद्द करण्यात आलीये. उद्या पुन्हा साक्ष नोंदवण्यात येणार आहे.

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याची उलटतपासणी करत आहेत. 26/11चा हल्ला कसा रचला गेला, आणि त्याचबरोबर पाकिस्तान लष्कराचा दहशतवाद्यांना नेमका कोणत्या प्रकारे पाठिंबा असतो, यावर निकम भर देतायेत. पाकिस्तानमध्ये 26/11 जो खटला सुरू आहे. त्यावर या साक्षीचा काही परिणाम होणार नाहीय, पण भारताला पाकविरोधात नवीन पुरावे नक्कीच मिळतायेत.

दरम्यान, काल मंगळवारी डेव्हिड हेडलीची साक्ष नोंदवण्यात आली. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा सर्व मोठ्या दहशतवादी संघटनांचा पाठिंबा आहे. त्यांना पैसाही आयएसआयकडून पुरवला जातो, असा खुलासा हेडलीनं कोर्टासमोर केला. सीएसटी आणि ताज हॉटेलबरोबरच सिद्धीविनायक मंदिरालाही टार्गेट करायचं होतं असा खुलासाही त्याने केला.

आयएसआयचा हस्तक साजिद मीर यानं मला सिद्धीविनायक मंदिराचे फोटो आवर्जून काढ असं सांगितलं होतं. ताज आणि ओबेरॉय हॉटेल, सीएसटी, महाराष्ट्र पोलीस मुख्यालय आणि कुलाब्याची मी नीट पाहणी केली. ताज हॉटेलच्या मोठ्या कन्व्हेन्शन रुमबद्दल बरीच चर्चा झाली. याचं कारण म्हणजे तिथे भारताच्या संरक्षण शास्त्रज्ञांची एक परिषद भरणार होती. पण तिथे दारूगोळा नेण्यात अडथळे येतील असं वाटल्यामुळे कन्व्हेन्शन सेंटरवर हल्ला करण्याचं कारस्थान रद्द झालं, असं हेडली म्हणाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2016 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close