S M L

राज्य सरकारला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान नकोसा, स्थगितीचे दिले निर्देश

Sachin Salve | Updated On: Feb 10, 2016 10:12 PM IST

राज्य सरकारला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान नकोसा, स्थगितीचे दिले निर्देश

 

मुंबई - 10 फेब्रुवारी : ग्रामीण भागात स्वच्छतेचा संदेश देणारं आणि अनेक गावांत सक्रीय पाठिंबा लाभलेलं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्याचे पाणीपुरवाठा आणि स्वच्छता खात्याचे उपसचिव रुचेश जयवंशी यांनी परिपत्रक काढून हे अभियान स्थगित करण्याचे निर्देश दिले आहे. चांगली योजना बंद करण्याच्या निर्णयामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होतं आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना त्यांच्या पुढाकारानं संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं होतं. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता खात्याचे उपसचिव रुचेश जयवंशी यांनी यासंबंधी परिपत्रक काढलंय. सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना हे परिपत्रक पाठवण्यात आलंय. 2014-15ची तपासणी झाली नसल्यानं हे अभियान स्थगित करत असल्याची सबब पुढे करण्यात आली आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं ही योजनाच रद्द करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. वास्तविक संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाला राज्यात उदंड प्रतिसाद मिळत होता, अशात तांत्रिक कारण पुढे करत यंदाच्या वर्षापुरती योजना स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.

6 फेब्रुवारीला पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागानं पाठवलेलं पत्र

"संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत सन 2014-15 मधील जिल्हा आणि विभागस्तरीय तपासणी अद्याप बाकी आहे. सन 2015-16 ची अंमलबजावणी प्रक्रिया संदर्भाधीन शासन निर्णयानुसार राबविण्यात कळविण्यात आले होते. सन 2014-15 मधील उर्वरित जिल्हास्तरीय आणि विभागस्तरीय प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतू संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत सन 2014-15 मधील जिल्हा आणि विभागीय तपासणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे 2015-16 ची प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. याबाबत आपणाला सूचित करण्यात येते की, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानासाठी क्षेत्रीय स्तरावर सुरू असलेली प्रक्रिया स्थगित करण्यात यावी."

आयबीएन लोकमतचे सवाल

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान स्थगित करण्यामागे सरकारचा नेमका हेतू काय आहे?

एक चांगली योजना बंद पाडून सरकार फक्त सुडाचं राजकारण खेळू पाहतंय का ?

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाला पर्याय म्हणून सरकार यापुढे कोणती योजना राबवणार ?

ग्रामीण विकासाला सरकार यापुढे नेमकी कशाप्रकारे चालना देणार आहे ?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 10, 2016 12:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close