S M L

सिनेमात महिलांच्या पाऊलखुणा

भाग्यश्री वंजारी, मुंबई 8 फेब्रुवारी भारतीय सिनेमा आणि स्त्रीवादाची संकल्पना यांचे एकमेकांमधील घट्ट नाते अनेकवेळा यशस्वीरित्या दाखवले गेले आहे. सेक्स ही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही असे नवर्‍याला सुनावणारी बायको दिसली महेश मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित अस्तित्व या सिनेमात. तब्बूच्या या संवादाने दिग्दर्शक आणि कलाकारांच्या मनातील स्त्रीवाद दाखवला.तर वाराणसीत राहणार्‍या एका विधवेच्या खडतर आयुष्यातले कंगोरे दीपा मेहताच्या वॉटर सिनेमातून पाहायला मिळाले. अभिनेत्री विद्या बालनचा इश्कियाँमधील बोल्ड रुपही असेच बदलत्या स्त्रीवादाचा भाग मानले गेले आहे. हिंदीच नाही तर मराठीतही स्त्रीवादावर अनेक लक्षवेधी सिनेमे बनले. अगदी आत्ता आत्ता आलेला रीटा वेलिणकर हा यापैकीच..रेणुका शहाणेचे पहिलेवहिले दिग्दर्शन आणि पल्लवीचा बहारदार अभिनय यामुळे हा सिनेमा विशेष लक्षात राहतो. आजच्या नोकरदार स्त्रियांची मानसिकता, रोजच्या आयुष्यात तिला सामोरे जावे लागणारी आव्हाने या सिनेमात मांडण्यात आली आहेत.यासगळ्या नावांच्या सरबत्तीत उंबरठा या सिनेमाचे नाव विसरुन कसे चालेल. स्मिता पाटील यांचा अविस्मरणीय अभिनय आणि त्या काळात करिअर करु इच्छिणार्‍या स्त्रीच्या समोरची आव्हाने या सिनेमात तेवढ्याच संवेदनशीलतेने मांडण्यात आलीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2010 11:30 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2010 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close