S M L

मुंबईत कारला भीषण अपघात, ड्रायव्हर जागीच ठार

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2016 09:25 AM IST

मुंबईत कारला भीषण अपघात, ड्रायव्हर जागीच ठार

मुंबई - 11 फेब्रुवारी : मुंबईतील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर विक्रोळी-मुलुंडच्या दरम्यान भरधाव वेगात जाणार्‍या एका स्कोडा कारचा अपघात झाला. यात चालक जागीच ठार झाला. बुधवारी रात्री ऐरोली उड्डाणपुलाजवळ ही घटना घडलीये. वरुण नायर असं या मृत चालकाचं नाव आहे.

भरधाव वेगात ऐरोली जवळचा ब्रिज चढताना चालकाचा कारवरील नियंत्रण सुटले आणि ही कार सुरक्षा भिंतीला आदळली आणि पलटी होतहोत 100 फूट अंतरावर रोडच्या बाजूला असलेल्या झाडीत जावून अडकली. या अपघातात चालकाचा देह अक्षरश: छन्नविच्छिन्न झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळवर आले तसंच अग्निशामक दलालाही तिथे बोलावण्यात आले. अडीच तासाच्या प्रयत्नानंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर या हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कार चालक हा औरंगाबाद येथील राहनारा असल्याचे त्याच्या जवळ सापडलेल्या ओळख पत्रावरून समजते. कांजुरमार्ग पोलीस याचा तपास करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 09:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close