S M L

शहीद सुनिल सुर्यवंशी यांचं पार्थिव उद्या पुण्यात आणणार

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2016 01:49 PM IST

शहीद सुनिल सुर्यवंशी यांचं पार्थिव उद्या पुण्यात आणणार

सातारा - 11 फेब्रुवारी : सियाचीनमधल्या हिमस्खलनात शहीद झालेले सातार्‍यातील जवान सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव उद्या पुण्यात येणार आहे. तिथून त्यांचं पार्थिव त्यांच्या मुळं गावी नेण्यात येणार आहे. वातावरण खराब असल्या कारणामुळे त्यांचं पार्थिव आणण्यास उशीर होत आहे.

मागील आठवड्यात सियाचिनमध्ये झालेल्या हिमस्खलनात ते शहीद झाले होते. हिमकडा कोसळल्यामुळे 10 जवान 25 फूट बर्फाच्या ढिगाखाली गाडले गेले होते. दोन दिवस शोधमोहिमेनंतर लष्काराने 10 जवान शहीद झाल्याची घोषणा केली होती. पण, त्यानंतरच्या शोध मोहिमेत 25 फूट बर्फाखाली एक जवान जिवंत सापडला. तर इतर 9 जवानांचे पार्थिव सापडले. या शहीद झालेल्या 9 जवानांमध्ये सुनील सुर्यवंशी यांचा समावेश आहे. सुनील सुर्यवंशी यांचं पार्थिव उद्या पुण्यात आणलं जाईल तेथून त्यांच्या मुळगावी सातार्‍याला नेण्यात येणार आहे. त्यानंतर  त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close