S M L

इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची एजंट होती - हेडली

Sachin Salve | Updated On: Feb 11, 2016 02:00 PM IST

इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची एजंट होती - हेडली

मुंबई - 11 फेब्रुवारी - गुजरातमध्ये बनावट एनकाऊंटमध्ये मारले गेलेली इशरत जहाँ ही लष्कर-ए-तोयबाची एजंट होती असा गौप्यस्फोट डेव्हिड कोलमन हेडलीने केलाय. यापूर्वी एनआयएच्या पथकानंही हेडलीची अमेरिकेत जाऊन चौकशी केली होती, तेव्हाही त्यानं इशरत ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याचं सांगितलं होतं. इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाच्या महिला आत्मघातकी पथकाची सदस्य होती, असंही हेडलीनं आज सांगितल्यामुळे खळबळ उडाली आहे.

26/11च्या दहशतवादी हल्ल्यातल्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या डेव्हिड कोलमन हेडलीची साक्ष आज तिसर्‍या दिवशीही सुरू आहे. सप्टेंबर 2006 मध्ये भारतामध्ये येण्यापूर्वी मेजर इक्बालनं आपल्याला 25 हजार डॉलर्स दिले होते, अशी माहिती हेडलीनं कोर्टाला दिली. आपले लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याची माहिती तहव्वूर राणाला माहित होतं. तसंच या दहशतवादी संघटनेसाठी आपण गुप्त माहिती गोळा करत असल्याची माहिती तहव्वूर राणाला होती असंही हेडलीनं सांगितलंय. 26/11च्या हल्ल्यापूर्वी तहव्वूर राणा मुंबईत आला होता, मी त्याला भारत सोडून जाण्याचा सल्ला दिला अशी माहितीही हेडलीनं दिलीये. तर दुसरीकडे जून 2004 मध्ये गुजरातमधील अहमदाबादमध्ये इशरत जहाँ आणि तिच्या तीन सहकार्‍यांना एनकाऊंटरमध्ये ठार मारण्यात आलं होतं. या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले होते. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी स्थापन करण्यात आली होती. समितीने इशरत जहाँ चकमक बनावट असल्याचा निर्वाळा दिला होता. आजच्या साक्षीमध्ये डेव्हिड हेडलीने पुन्हा एकदा इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाची सदस्य होती, अशी माहिती मुंबई कोर्टासमोर दिली. यापूर्वी एनआयएच्या पथकानं त्याची अमेरिकेत जाऊन चौकशी केली होती, तेव्हाही त्यानं इशरत ही लष्कर ए तोयबाची सदस्य असल्याचं सांगितलं होतं. इशरत जहाँ ही लष्कर ए तोयबाच्या महिला आत्मघातकी पथकाची सदस्य होती, असंही हेडलीनं सांगितलंय.

हेडली खोटं बोलतोय -मुशरत जहाँ

दरम्यान,हेडली काय म्हणतो आहे. त्याच्याशी काही संबंध नाही, मला एवढंच माहिती आहे माझी बहिण निर्दोष होती अशी प्रतिक्रिया इशरत जहाँची बहीण मुसरत जहाँने दिलीये.आमचा कायद्यावर विश्वास आहे,आम्ही कायदेशीर मार्गानेच लढाई लढू. आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत न्यायलयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं मुसरत जहाँ यांनी सांगितलं. इशरत जहाँच्या एनकाऊंटर हे राजकीय षड्‌यंत्र आहे. काही मोठया राजकीय नेत्यांचा यात हात आहे.हेडलीला सरकारकडून काही मदत हवी आहे म्हणून त्यानं इशरतचं नाव घेतलंय असा आरोपही मुसरत जहाँ यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 01:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close