S M L

सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण!

Samruddha Bhambure | Updated On: Feb 11, 2016 09:18 PM IST

SENSEX BANNER

मुंबई – 11 फेब्रुवारी : युरोपियन बाजारातल्या मंदीचा मोठा परिणाम मुंबई शेअर बाजारात गुरुवारी पाहायला मिळाला. सेन्सेक्समध्ये आज मोठी घसरण होत तो 807 अंकांनी गडगडला. तर निफ्टीही मे 2014नंतर प्रथमच सात हजार अंकांच्या खाली बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीचा हा सलग चौथा दिवस आहे.

मुंबई शेअर बाजारात आज (गुरूवारी) दिवसअखेर 807.7 अंकांची घसरण झाली आणि तो 22 हजार 951.83 अंकांवर बंद झाला. दिवसभरातील कामकाजात सेन्सेक्स 23 हजार 758 स्तरावर पोहोचला होता. सेन्सेक्ससह राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात देखील घसरण पाहायला मिळाली. एनएसईमध्ये 239.35 अंकांची घसरण होत तो 6 हजार 976.35 अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील 30 पैकी 29 शेअरमध्ये घसरण झाली. तर निफ्टीमधील 50 पैकी 48 कंपन्यांचे भाव गडगडले.

मुंबई शेअर बाजारातील मेटल, तेल, गॅस, वीज, बँका, आयटी, इंफ्रा आणि ऑटो या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची मोठी विक्री झाली. निफ्टीतील बँक इंडेक्स 3.8 टक्क्यांनी घसरला. तर पीएसयू बँक इंडेक्समध्ये 3 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. दरम्यान, शेअर बाजारात उद्याही घसरण सुरुच रहाणार असल्याचा अंदाज मार्केट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close