S M L

नक्षलवाद्यांशी लढणारी रणरागिणी

कल्पना असूर, गडचिरोलीगडचिरोली म्हणजे नक्षलवाद्यांचे माहेर घर. इथे सत्ता चालते ती फक्त नक्षलवाद्यांचीच. पण त्यांच्या दहशतीविरूद्ध एका अशिक्षित महिला लढत आहे. या रणरागिणीने पहिली महिला कमांडो होण्याचा मान मिळवला आहे. छाया नेवारे असे या महिला कमांडोचे नाव आहे. कमला नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या कमलापूरच्या. नक्षलवाद्यांना धूप न घालणार्‍या कमला यांच्या बहिणीला नक्षलवाद्यांनी पळवून नेले. पोलिसांच्या मदतीने त्यांनी बहिणीला सोडवले. आणि इथेच त्यांच्या आयुष्याने वळण घेतले.कमला पोलिसांच्या खबरी बनल्या...त्यांच्या कामामुळे अनेक नक्षलवादी जेरबंद झाले. त्यामुळे नक्षलवादी त्यांच्या जीवावरच उठले. 1986 पासून त्यांचा असा नक्षलवाद्यांशी लढा सुरू होता. त्यांच्या या कामगिरीमुळेच त्यांना पोलीस सेवेत येण्याचे निमंत्रण मिळाले. आणि 1991मध्ये त्या पोलीस दलात भरती झाल्या. कमला यांच्या कामगिरीचा त्यांच्या सहकार्‍यांनाही अभिमान आहे. नक्षलवाद विरोधातील विशेष पथकात काम करणार्‍या 70 पुरुषांमध्ये त्या पहिला महिला कमांडो होत्या. आता पथकप्रमुख बनलेल्या कमला यांना अजून बराच पल्ला गाठायचा आहे. नक्षलवाद्यांना नेस्तनाबूत करायचे आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 8, 2010 01:25 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 8, 2010 01:25 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close