S M L

100 वर्षांपूर्वी आईन्स्टाईननं केलेलं गुरुत्वीय लहरींविषयीचं भाकीत ठरलं खरं

Samruddha Bhambure | Updated On: Feb 12, 2016 09:47 AM IST

100 वर्षांपूर्वी आईन्स्टाईननं केलेलं गुरुत्वीय लहरींविषयीचं भाकीत ठरलं खरं

पुणे – 11 फेब्रुवारी : 100 वर्षांपूर्वी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी गुरुत्वीय लहरींविषयी भाकित वर्तवलं होतं, आता या लहरी अस्तित्वात असल्याची घोषणा करण्यात आली आहे. लिगो सायन्टिफिक कोलॉबरेशननं यावर शिक्कामोर्तफ केलंय. आईन्स्टाईनच्या भाकितानंतर गेल्या 100 वर्षंापासून गुरुत्वीय लहरींविषयी संशोधन सुरू होतं. आता या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाविषयी माहिती मिळाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये मोठी प्रगती झाल्याचं मानलं जातंय.

गेल्या शंभर वर्षांत गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्व सिद्ध झालेल नाही. आज गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत गुरुत्वीय लहरिच्या अस्तित्वात असल्याची घोषणा करण्यात आली. एकाच वेळी वॉशिंगटन डी सी ,भारत आणि इटली इथून घोषणा करण्यात आलीये.पूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वाबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आलं.

150 किमी व्यास असलेले ब्लॅक होल्स जेव्हा एकमेकांच्या भोवती फिरतात आणि एक वेळ अशी स्थिती येते जेव्हा दोन्ही ब्लॅक होलपासून एक मोठा ब्लॅक होल तयार होतो. यावेळी गुरुत्वीय लहरी तयार होतात. विश्वात होणारी ही घटनेत तयार झालेली गुरुत्वीय लहर संशोधकांनी 'लायगो ' या डिटेक्टरद्वारे पकडल्या गेल्यात. या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचा मोलाचा वाटा आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटद्वारे भारतीय शस्त्रज्ञान अभिनंदन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2016 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close