S M L

समुद्रकिनारी सहलीला जाता येणार, 'तो' आदेश मागे

Sachin Salve | Updated On: Feb 12, 2016 11:31 AM IST

समुद्रकिनारी सहलीला जाता येणार, 'तो' आदेश मागे

12 फेब्रुवारी : रायगडमधील मुरूडला सहलीला गेलेल्या 14 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर सरसकट समुद्रकिनार्‍यावर सहलीला जाण्यात निर्बंध घालण्यात आले होते. पण शिक्षण विभागाने तो सहली संदर्भातला आदेश मागे घेतला आहे. उंच ठिकाणं, समुद्रकिमार्‍यावर आता सहलीला जाता येणार आहे. शिक्षण विभागाचे उपसंचालक रामचंद्र जाधवांनी ही माहिती दिलीये.

मुरुडच्या समुद्र किनारी पुण्यातील अबिदा इनामदार कॉलेजच्या विद्यार्थ्यांची सहल गेली होती. मुरुडच्या समुद्राला भरती आली असतांना 25 विद्यार्थी पोहण्यास गेले. त्यावेळी 14 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाने उंच ठिकाणी आणि समुद्र किनारी सहल नेण्यास बंदी घातली होती. सरसकट बंदी घातल्यामुळे शाळांमधून नाराजीचा सूर उमटत होता. अखेरीस सहली संदर्भातला हा आदेश आता मागे घेण्यात आलाय. शंभर रुपयाच्या स्टँपपेपरवर हमीपत्राची अट देखील मागे घेण्यात आली आहे. याबाबतचं सुधारित परिपत्रक पुढच्या दोन दिवसात काढलं जाणार आहे. त्यामुळे शाळांना दिलासा मिळाला आहे. पण, सुरक्षित ठिकाणी सहली काढल्या जाव्यात अशी मागणीही पालकांकडून केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2016 11:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close