S M L

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

Samruddha Bhambure | Updated On: Feb 12, 2016 07:46 PM IST

महापालिका निवडणुकीआधी मुंबईकरांना टोलमुक्ती नाहीच

मुंबई - 12 फेब्रुवारी :  महापालिका निवडणुकीआधी टोलमुक्ती मिळेल या आशेवर असलेल्या मुंबईकरांची निराशा होण्याची शक्यता आहे. कारण सार्वजनिक बांधकाम खात्यानं नेमलेल्या आनंद कुलकर्णी समितीनं दिलेल्या अहवालात सध्या टोल बंद करणं सरकारला परवडणारं नसल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवरची टोलधाड यापुढेही सुरूच राहणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने राज्यातील जनतेला टोलमुक्तीचं वचन दिलं होतं. त्यामुळे सरकारसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. तत्कालीन सरकारनं एमईपी कंपनीशी केलेले करार पाहता जर टोल बंद करायचा असेल तर या अहवालात आनंद कुलकर्णी यांनी दोन पर्याय सुचवले आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे हे टोल विकत घेणे, पण त्यासाठी सरकारला तब्बल 2021 कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागेल. त्यामुळे हा पर्याय व्यवहार्य नसल्याचं समितीने म्हटलं आहे. तर दुसरा पर्याय म्हणजे छोट्या चारचाकी वाहनांना टोल माफी करणे, पण मुंबई टोल हे राज्यतील इतर टोल पेक्षा वेगळे आहे. कारण इतर टोल वर छोटी चार चाकी वाहन 15 ते35 टक्के आहेत पण मुंबईत मात्र 85 टक्के छोटी वाहन आहेत. त्यामुळे सरकार मुंबई टोलसाठी नेमकी काय करता येईल फॉर्मुलावर काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 12, 2016 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close