S M L

भटक्या कुत्र्यांचा हल्ला, दीड वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2016 06:20 PM IST

 भटक्या कुत्र्यांचा हल्ला, दीड वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

पिंपरी चिंचवड - 13 फेब्रुवारी : चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका दीड वर्षांच्या चिमुकल्याच्या जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड़ जवळील मान गावात घडली आहे. विटभट्टी कामगार असलेल्या नाटेकर दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा होता. रात्री दार उघड असल्यानं हा चिमुकला पडला आणि काही अंतरावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याचे लचके तोडले. पालिका कर्मचारी भटक्या कुत्र्यांना इथं आणून सोडतात त्यामुळे त्या चिमुकल्याच्या मृत्यूला पालिका अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

मान गावातील बोडकेवाडीमध्ये राहणार्‍या विटभट्टी कामगार असलेल्या नाटेकर दाम्पत्याचा हा एकुलता एक मुलगा होता. रात्री नाटेकर झोपेत असतांना खोलीच दार उघड असल्याने हां चिमुकला बाहेर पडला घरापासून थोड्या अंतरावर जाताच रस्त्यावरील चार भटक्या कुत्र्यांनी या चिमुरड्यावर झड़प घातली आणि त्याचे लचके तोडले.

कुत्र्यांच्या भूंकन्याचा आवाज एकूण संदीपची आई जागी झाली आणि आपला मुलगा जागेवर नसल्यामुळे ती बाहेर आली पण तो पर्यंत खूप उशीर झाला होता. मानगाव परिसरात फिरणारी सर्व भटकी कुत्री ही पिंपरी चिंचवड़ महापालिका हद्दीतील असून पालिका कर्मचारी नेहमी अशी कुत्रे इथं आणून सोडतात आणि त्यामुळे या भटक्या कुत्र्यांच्या या हल्ल्याला पिंपरी महापालिकेतील कर्मचारीच जबादार असल्याचा आरोप मान गावच्या ग्रामपंचायत सदस्यानी केला आहे. आता या सर्व प्रकरणाचा तपास मान पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 06:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close