S M L

उद्धव ठाकरे खरं बोलले होते, भाजपवाल्यांनी फसवलं -जानकर

Sachin Salve | Updated On: Feb 13, 2016 10:14 PM IST

उद्धव ठाकरे खरं बोलले होते, भाजपवाल्यांनी फसवलं -जानकर

सांगली - 13 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे म्हणाले होते की आमची 25 वर्षांची मैत्री असताना भाजपवाल्यांनी आम्हाला फसवले होते,हे तुम्हाला पण फसवतील. हे उद्धव ठाकरे यांचं मत आता आम्हाला पटायला लागलंय अशी टीका आमदार महादेव जानकर यांनी केली. सांगलीतल्या मणेराजुरी इथल्या दुष्काळी पाणी परिषदेत जानकर हे बोलत होते. तर दुसरीकडे म्हैशाळ योजना सुरू करण्यासाठी आठ दिवसांचे अल्टीमेटम देण्यात आलं असून, जर योजना सुरू केली नाही, तर म्हैशाळ योजनेच्या कार्यक्षेत्रात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

आम्हाला माहित नव्हते आम्ही भोली-भाबडी होतो,काँग्रेस राष्ट्रवादी पेक्षा हे बरे आहेत म्हणून सत्ता दिली पण हे पण महाछत्तरवाघ निघालेत अशी टीका करून जाणकार पुढे म्हणाले. सत्ता आमच्या जीवावर घेतली आणि आता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र यायची चिन्हे दिसत आहेत. चोर - चोर एकत्र येऊ पाहत आहेत. सत्तेची मस्ती येऊ देऊ नका अशा इशारा जानकर यांनी सरकारला दिला.

तुम्हाला लालदिव्याच्या गाडीसकट जाळतील -शेट्टी

दरम्यान, म्हैशाळ योजनेसाठी सरकारला 8 दिवसांचे अल्टीमेटम दिले आहे. येत्या आठ दिवसांत जर योजना सुरू केली नाहीतर 21र फेब्रुवारी ला सांगली जिल्ह्यात एका मंत्र्याला फिरू देणार नाही. चक्का जाम आंदोलन करणार आहे अशा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

पुढे ते म्हणता, सरकारला नुसता इशारा देऊन चालणार नाही. पाण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू आम्ही काय भिकारी आहोत काय ?, सिंचनामध्ये पैसे खाणारे उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांच्या मुसक्या आवळायला पाहिजेत. लुटारूंवर भाजप सरकारने कोणती कारवाई केली. उद्योगपतीचे लाड करायला तुमच्याकडे पैसे आहेत. शेतकर्‍यांच्या वीज बिलासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत. भीक मागून न्याय मिळणार नाही. तर रस्त्यावर उतरून न्याय मिळवू जर रस्त्यावर उतरून न्याय नाही मिळाला तर हे शेतकरी तुम्हाला लालदिव्याच्या गाडीसकट जाळतील असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

पावणे दोन वर्षे झाली तरी मंत्रिपदाचे फायनल होईना,आम्ही सरकारसोबत फक्त शेतकर्‍यांसाठी गेलो होतो. सत्ता आणि सत्तेची नशा खूप वाईट असते पण आता सत्तेची नशा आल्यामुळे ओळख दाखवायला तयार नाहीत अशी टीका करून सदाभाऊ खोत पुढे म्हणाले,राज्यातील शेतकर्‍यांच्यावर अन्याय कराल तर मोठा लढा उभारू असा इशारा सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 13, 2016 06:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close