S M L

मुंबईकर वेठीस, रिक्षाचालकांचा संप संपला

Sachin Salve | Updated On: Feb 15, 2016 09:20 PM IST

Auto Rickshawमुंबई -15 फेब्रुवारी : मुंबईकरांना एक दिवस वेठीस धरून रिक्षाचालकांनी संपाचे हत्यार उपसले. रिक्षा युनियनचे नेते शशांक राव आणि परिवहन आयुक्तांमध्ये बैठक पार पडली पण यात कोणताही तोडगा निघाला नाही. चर्चा सकारात्मक झाली असली तरी दोन-तीन दिवसांत पुन्हा बैठक घेऊन संपाचा निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. परंतु, आज संध्याकाळी 6 वाजता रिक्षा पूर्ववत धावतील असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार 6 च्यानंतर रिक्षाचालक पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे.

मुंबईतील रिक्षाचालक आज संपावर आहेत. शशांक राव आणि परिवहन आयुक्तांची बैठक संपली आहे. चर्चा सकारात्मक झाली पण कोणताही निर्णय झाला नाहीये. त्यामुळे संघटनेनं पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. येत्या दोन-तीन दिवसांत पुन्हा बैठकी घेऊन निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज संध्याकाळी 6 पर्यंत रिक्षा बंद राहतील तर संध्याकाळी 6 नंतर मुंबईच्या उपनगरात रिक्षा सुरु होतील. नविन रिक्षांच्या परवान्यांचं वितरण, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा, खासगी टॅक्सी कंपन्यांवर कारवाई या प्रमुख मागण्यांसाठी रिक्षाचालक एक दिवसाच्या लाक्षणीय संपावर होते. उपनगरातले जवळपास 1 लाख 4 हजार रिक्षाचालक यामध्ये सहभागी झालेत पण सरकार आणि रिक्षाचालकांच्या या वादात चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत. काही रिक्षावाल्यांना तर संप का आहे हेही माहीत नाहीय. फक्त युनियननं सांगितलं म्हणून ते संपात सहभागी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 15, 2016 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close